Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

तारुखेडले  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतिशील व ऐतिहासिक असे गाव आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या सुमारे २१३५  आहे .गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्र २, व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहे तसेच चार मंदिर, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण टाकी, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस कांदा सोयाबीन मका टोमॅटो ही प्रमुख पिके घेतली जातात .ऊस व कांदा पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तारुखेडले  ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत प्रधानमंत्री घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना,रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावास संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF)दर्जा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात येतो. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच असे १०  सदस्य मिळून गावाचा  सर्वांगीण विकास घडवून आणतात... ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

तारुखेडले  निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

तारुखेडले  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतिशील व ऐतिहासिक असे गाव आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या सुमारे २१३५  आहे .गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्र २, व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहे तसेच चार मंदिर, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण टाकी, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस कांदा सोयाबीन मका टोमॅटो ही प्रमुख पिके घेतली जातात .ऊस व कांदा पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तारुखेडले  ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत प्रधानमंत्री घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना,रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावास संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF)दर्जा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात येतो. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच असे १०  सदस्य मिळून गावाचा  सर्वांगीण विकास घडवून आणतात... ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात....

तारुखेडले  निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

लोकजीवन

तारुखेडले  चे लोकजीवन साधी राहणी, श्रमप्रदान व पारंपारिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून ऊस,कांदा सोयाबीन व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्ये कार्यरत आहेत. गावात विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा झोपल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव सण, गावात भरवला जाणारा मारुती मंदिर सप्ताह, गावाच्या एकात्मतेच दर्शन घडवतो. गणेश उत्सव, दिवाळी नवरात्र, महाशिवरात्री, अक्षयतृतीया आनंदाने व एकोप्याने साजरा करतात.तसेच स्थानिक देवतांच्या पूजाना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारी आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्राम विकास व स्वयं सहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तारुखेडले च्या लोक जीवनात पारंपारिक ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकतेची झलकही दिसते. ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष ११०५     
स्त्री १०३०
एकूण २१३५

संस्कृती व परंपरा

तारुखेडले चे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे ते वर्षभर विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सव,नवरात्र, दिवाळी होळी, महाशिवरात्र यासारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणामुळे गावातील मुलं, तरुण ,वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करतात. गावात लोककला कीर्तन भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्यात चालत आलेल्या परंपरा जतन करण्यात नवीन पिढी  आधुनिकतेशी  जुळवून घेते. स्त्रियांचा सहभाग ग्राम विकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. स्वयंसहायक गटाद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात त्यामुळे तारुखेडले चे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

गावातील मुळमुकाई माता  मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात..

मारुती मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात असलेने हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटी— गाठींचे केंद्र आहे.

★शेती क्षेत्र★

 तारुखेडले  हे ऊस व कांदा  व द्राक्षे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेती आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जलसंधारण प्रकल्प पाणलोट क्षेत्राचा विकास व जलसंधारणाची चांगली सोय यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.. त्यामुळे  नांदूर मधमेश्वर अभयारण्य सारखे पर्यटन स्थळ तारुखेडले  लगत आहे.

जवळची गावे

तारुखेडले  निफाड तालुक्यातील व सिन्नर तालुक्यातील जोडणारे ठिकाण  आहे. आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही तारुखेडले गावे शी सामाजिक ,शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेली आहेत. तारुखेडले च्या जवळपास  सायखेडा, निफाड, सिन्नर ह्या मोठ्या बाजारपेठा आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.न. सदस्याचे नाव पद मोबाईल क्रमांक
सौ. अनुसया एकनाथ आंधळे सरपंच
सौ. सोनाली भारत हांडगे उपसरपंच
श्री. चिंतामण दत्तात्रय दौंड सदस्य
सौ. भारती भारत जगताप सदस्य
सौ. निशा रंगनाथ शिंदे सदस्य
सौ. मंगला किशोर जगताप सदस्य
सौ. शालन राजेंद्र शिंदे सदस्य
श्री. बाळू नरहरी पारधी सदस्य
श्री. शरद काशिनाथ जगताप सदस्य
१० श्री. प्रवीण सुनिल जगताप सदस्य

लोकसंख्या आकडेवारी


388
2135
1105
1030
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6